‘जय भीम’ने दुमदुमले शहर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

औरंगाबाद - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, जय भीमचा निनाद आणि प्रचंड घोषणांनी शनिवारी (ता. १४) शहर दुमदुमले होते. भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला सकाळी आठच्या सुमारास पोलिस बॅंडने मानवंदना दिली, तर दुपारी साडेबाराच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान, अभिवादन सभा पार पडली. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 

महामानवास अभिवादन करण्यासाठी शहरातील विविध भागांतून पक्ष, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सकाळपासूनच दाखल झाले होते. जयंतीची धामधूम दोन दिवसांपासून सुरू होती. मध्यरात्री बारा वाजता आंबेडकरी अनुयायांनी फटाक्‍यांची आतषबाजी करीत आपल्या घरासमोर पताका, पणत्या, विद्युत रोषणाई करून घरावर, विहारावर पंचरंगी आणि निळे ध्वज लावत जयंती उत्सवाला उत्साहात सुरवात झाली. भडकल गेट भागात असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. गटा-गटाने तरुण-तरुणी, आबालवृध्दांसह नागरिकांची दिवसभर रीघ होती. 

पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिस बॅण्ड पथकाने सकाळी मानवंदना दिली. यावेळी गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला होता. त्यानंतर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या अभिवादन सभेला सुरवात झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. समता सैनिक दल, सम्यक उपासक संघ, रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पार्टी संत परिषद, भारतीय बौद्ध महासभा, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, शिवसेना, काँग्रेस, चर्मकार महासंघ, भाजपच्या वतीने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

Web Title: ambedkar jayanit celebration in aurangabad