महापालिकेचे 88 गाळे रिकामे 

महापालिकेचे 88 गाळे रिकामे 

औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना दुसरीकडे मालमत्ता विभागामार्फत मिळणाऱ्या उत्पन्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. सध्या शहराच्या विविध भागांतील संकुलामध्ये 88 गाळे अनेक महिन्यांपासून रिकामे आहेत. या गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी आचारसंहिता संपताच निविदाप्रक्रिया राबवावी, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. 20) प्रशासनाला दिले. 

महापालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त लावण्यासह छोट्या-मोठ्या उत्पन्नाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे सोमवारी समोर आले. महापौरांनी मालमत्ता विभागाची आढावा बैठक घेतली असता, शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या मालकीचे 88 गाळे रिकामे असल्याचे समोर आले. रिकामे गाळे व्यापाऱ्यांना भाड्याने देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली नाहीत. त्यामुळे उत्पन्नही बुडत आहे. गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी आचारसंहिता संपताच निविदा काढण्याचे आदेश महापौरांनी या वेळी दिले. बैठकीस उपायुक्त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सहायक आयुक्त पंकज पाटील, वामन कांबळे यांच्यासह वॉर्ड अधिकारी, इमारत निरीक्षकांची उपस्थिती होती. 

मालमत्तांची घ्या मालकीहक्कात नोंद 
महापालिकेच्या शहरात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांची नोंद सातबारा उताऱ्यावर व मालकीहक्कात घेण्यासाठीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे; मात्र अद्याप शंभर टक्के मालमत्तांची नोंदणी झालेली नाही. वारंवार सूचना करूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही ठिकाणी अतिक्रमणे केली जात आहेत. या मालमत्तांची मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश या वेळी प्रशासनाला देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com