AMC : थकीत कर वसुलीसाठी महापालिका देणार सूट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

शहरातील मालमत्ताधारकांकडे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर थकीत आहे; तर दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. हा खडखडाट दूर करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी व्याज व शास्तीवर 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली होती. यंदा पुन्हा एकदा ही सवलत द्यावी, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना केली आहे. 

औरंगाबाद - शहरातील मालमत्ताधारकांकडे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर थकीत आहे; तर दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. हा खडखडाट दूर करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी व्याज व शास्तीवर 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली होती. यंदा पुन्हा एकदा ही सवलत द्यावी, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना केली आहे. 

शहरात मालत्ताकरापोटी सुमारे 400 कोटी रुपये थकीत असल्याचे महापालिकेतर्फे सांगितले जाते. दुसरीकडे मात्र महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गतवर्षी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेत तीन वेळा विशेष मोहीम राबविली. यावेळी शास्ती व व्याजावर 75 टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली होती. त्यामुळे वसुलीचा आकडा शंभर कोटींवर पोचला.

याच धर्तीवर यंदाही दोन वेळा विशेष मोहीम राबविली; मात्र व्याज व दंडात कोणतीही सूट जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे वसुलीला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा विशेष मोहीम राबवून 75 टक्के सूट द्यावी, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AMC will give concession in tax