जालना : अमेरिकन बनावटीचे पिस्तूल जप्त

उमेश वाघमारे
शनिवार, 13 एप्रिल 2019

जालना : जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका संशयिताच्या राहत्या घरी शुक्रवारी (ता. 12) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अमेरिकन बनावटीचे पिस्तूलासह एक जीवंत काडतुस जप्त केले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषांगाने परवाधारक शास्त्र पोलिस प्रशासनाकडे जमा करणे बांधणकार आहे. जिल्ह्यातील तब्बल 545 परवानाधारक शस्त्रधारी आहे. त्यापैकी 95 टक्के परवानाधारक शस्त्र  पोलिस प्रशासनाकडे जमा झाले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या अनुषांगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

मागील पाच दिवसात पाच तलवारीसह अनेक घातक शस्त्र पोलिस प्रशासनाने जप्त केले आहेत. यात ता.9 एप्रिल  रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने एकाला तलवारीसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर एडीएसने ता.11 एप्रिलला तलवार, कोयता, चाकू, सत्तुरसह एकाला ताब्यात घेले होते. तर शुक्रवारी (ता.12) स्थानिक गुन्हे शाखेने तीन तलवारी, सत्तुर, रेम्बो चाकू, खंजीर, गुप्ती असा मोठ्या शस्त्र  साठ्यासह एकाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी ( ता.12) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना जालना शहरातील रामनगर कॉलनी येथील नीलेश भिकाजी भिंगारे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (ता.12) रात्री उशिरा स्थानिक  गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित नीलेश भिंगारे याच्या राहत्या घरी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान नीलेश भिंगारे याने आपल्याकडे पिस्तूल असल्याची कबुली देत पिस्तूल मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर  तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंठा चौफुली परिसरातील शेख हकीम उर्फ पप्पू शेख रहीम याच्या राहत्या घरी छापा टाकुण अमेरिकन बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले. तसेच निलेश भिकाजी भिंगारे व शेख हकीम उर्फ पप्पू शेख रहीम या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान मागील पाच दिवसांमध्ये पोलिस प्रशासनाने घातक शस्त्रांचा  मोठा साठा जप्त केला आहे.

Web Title: american pistol found at jalana 2 arrested