सरकारच्या कामगिरीचे  वस्त्रहरण करा - देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

लातूर -  ""सत्तेवर येण्यापूर्वी आणि नंतर विद्यमान राज्यकर्त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या सरकारवर समाजाचा एकही घटक खूश नाही. केवळ लोकांची दिशाभूल करून पुन्हा सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या या मंडळीचे वस्त्रहरण करावे,'' असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले. 

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांत्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, सांघिकपणे तयारी सुरू करावी. हा लढाईचा काळ असून स्थानिक मुद्दे, शासनाच्या पाच वर्षांच्या नाकर्तेपणाचे वास्तव लोकापर्यंत पोचवणे गरजेचे आहे, असा सल्ला देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच झालेला विस्तार नसून भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांना बाजूला सारण्याचा प्रकार होता, असेही ते म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Deshmukh criticized the government performance