अमित शहा-राणे भेटीची माहिती नाही - दानवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

लातूर - गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. यात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ही भेट झाली की नाही हे मला माहीत नाही; पण भविष्यात काहीही घडू शकते, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केले. 

महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ श्री. दानवे यांची गुरुवारी (ता. 13) येथे जाहीर सभा झाली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

मी येथे प्रचारासाठी आलो आहे. भाजपसाठी वातावरण चांगले आहे. सध्या देशात बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू आहेत; पण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट झाली की नाही याची मला कल्पना नाही; पण भेट झाली नाही, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे श्री. राणे भाजपमध्ये येणार यावर आताच सांगता येणार नाही; पण भविष्यात काहीही घडू शकते, असे ते म्हणाले. 

सर्वांसाठी भारतीय जनता पक्षाची दारे उघडी आहेत; पण पक्षात घेताना एक सूत्र ठरविण्यात आले आहे. या सूत्रात बसणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे, असे ते म्हणाले. ईव्हीएम मशीनचीही सध्या चर्चा सुरू आहे; पण या मशीनमध्ये फेरबदल होत नाही. यात काही छेडछाड करता येत असेल तर ते दाखवून द्यावे, असे आव्हानच निवडणूक आयोगाने दिले आहे, अशी माहिती श्री. दानवे यांनी या वेळी दिली.

Web Title: Amit Shah-Rane no appointment information