...अन सुपारी किलर इम्रान मेहंदी गेला तुरुंगात 

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात मेहंदीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी सोमवारी (ता. 14) दिले. आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी पुणे येथील येरवडा जेलमधून ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. 

सुपारी किलर इम्रान मेहंदीचे जामीनावर सुटलेले साथीदार हबीब खालेद हबीब मोहंमद ऊर्फ खालेद चाऊस आणि मोहंमद शोएब मोहंमद सादेक हे कट रचून इम्रान मेहंदीला पोलिस संरक्षणातून पळवून नेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. याआधारे 27 ऑगस्ट 2018 ला गुन्हे शाखा पोलिसांनी नारेगाव चौकात सापळा रचून दहा जणांना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्टल, काडतुसे, दोन कार आणि मोबाईल देखील यावेळी जप्त करण्यात आले. तसेच यातील एकाने गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर पिस्टल रोखले होते. प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी 16 आरोपींना अटक केली. तर न्यायालयाने पोलिस कोठडी नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. गुन्ह्यात 15 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And Supari Killer Imram Mehandi in Harul Jail.