साडेतीनशे आंगणवाडीसेविकांची अटकेनंतर सुटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मानधनवाढ, पेन्शन या मागणीसाठी आयटकप्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्यावतीने गेल्या 18 दिवसांपासून बैठका व प्रशिक्षणावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. 19 व्या दिवशी ऑगस्ट क्रांतीदिनी अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांतर्फे शुक्रवारी (ता. नऊ) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पैठण गेट येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद परिसरात पोलिसांनी 350 आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. 

औरंगाबाद  : मानधनवाढ, पेन्शन या मागणीसाठी आयटकप्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्यावतीने गेल्या 18 दिवसांपासून बैठका व प्रशिक्षणावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. 19 व्या दिवशी ऑगस्ट क्रांतीदिनी अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांतर्फे शुक्रवारी (ता. नऊ) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पैठण गेट येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद परिसरात पोलिसांनी 350 आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. 

केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली; मात्र राज्य शासनानेही राज्यात ही वाढ लागू करूनही त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही. एकीकडे कर्मचारी कमी असल्याने कामाचा वाढता ताण आणि मानधनवाढ नाही अशा अवस्थेत सापडलेल्या अंगणवाडी व बालवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या 22 जुलैपासून राज्यभर बहिष्कार आंदोलन पुकारलेले आहे. याचाच भाग म्हणून क्रांतिदिनी शुक्रवारी क्रांतीदिनी अंगणवाडी कर्मचारी पैठण गेट येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

मोठ्या संख्येने जमलेल्या अंगणवाडी व बालवाडी कार्यकर्त्यांनी जेलभरो केले. यावेळी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणाबाजी करण्यात आली. मानधनवाढ व दरमहा सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावे, प्रलंबित निवृत्तीनंतरच्या एकरकमेची सर्व प्रकरणे निकाली काढावीत, प्रवासभत्त्याची थकीत देयके देण्यात यावीत आदी मागण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सुमारे साडे तीनशे महिलांना क्रांतीचौक पोलिसांनी अटक करुन नंतर त्यांची सुटका झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi servicewomen released after arrest