अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिल्या मुख्यमंत्री हाय हायच्या घोषणा

Anganwadi workers gave the announcement against Chief Minister
Anganwadi workers gave the announcement against Chief Minister

परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी (ता. 8) जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने  हाय हाय अशी घोषणाबाजी केली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवुन त्यांना वेतनश्रेणी व भत्ते देण्यात यावेत, केंद्र सरकारच्या ता. 20 सप्टेंबर 2018 ला मानधन वाढीच्या अधिसुचनेची अंमलबजावणी करावी, केरळ, दिल्ली, हरीयाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावे, सेवा समाप्ती नंतर एक लाख रुपये लाभ दिला जातो. ती रक्कम तिपटीने वाढवावी अशा विविध मागण्यांसाठी अशा विविध 12 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्या महिलांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासोबतच महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाने हाय हायच्या घोषणा दिल्या. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड आदींच्या नेतृवात आंदोलन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com