...तर अनिल अंबानींच्या घरावर मोर्चा काढू - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

परभणी - जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा, अन्यथा रिलायन्स विमा कंपनीचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे रविवारी (ता. आठ) दिला. अंबानींच्या विमा कंपनीपुढे सरकारने गुडघे टेकले असल्याचा आरोप त्यांनी केला. परभणीत रिलायन्स पीकविमा कंपनीवर गुन्हा दाखल करून लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी 26 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा बंद, रास्ता रोको अशा आंदोलनानंतर आता शेतकरी प्राणांतिक उपोषण करीत आहेत. रविवारी (ता. आठ) खासदार श्री. शेट्टी यांनी परभणीत येऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
Web Title: Anil Ambani Home Rally Raju Shetty