पशुसंवर्धन विभागाचे 'गुजरात कनेक्‍शन'

दत्ता देशमुख
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

बीड - बीड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या खरेदीत गुजरात कनेक्‍शन असल्याचे समोर आले असून, पशुवैद्यकीय रुग्णालयांत पुरवठा केलेल्या सुयांच्या बॉक्‍सवरील किमतीचे स्टिकर काढताच "फॉर द यूज ऑफ गव्हर्न्मेंट ऑफ गुजरात-नॉट फॉर सेल' या ठळक मजकुराने खरेदीचे पितळ उघडे पाडले आहे.

रुग्णालय आणि तालुका स्तरावरून खरेदी झाली असली तरी ठरावीक एजन्सीकडून पुरवठा, त्याच एजन्सीकडून खरेदीसाठी वरिष्ठ स्तरावरुरून केलेली सक्ती, मार्चमध्ये जनावरांच्या लसीकरणासाठी सुयांच्या गरजेसाठी खरेदीची गरज दाखवून एप्रिल-मे महिन्यांत पुरवठा करून जुन्या तारखेंचे देयक, काही अधिकाऱ्यांनी चक्क खरेदीचे धनादेश स्वत:च्या नावे उचलणे आदी अनेक संशयास्पद बाबी या खरेदीत घडल्या आहेत. पशुपालकांकडून सेवाशुल्कापोटी जमा झालेली रक्कम खरेदीच्या नावाखाली हडप करणारी साखळीच असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जिल्ह्यात 140 पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. त्यात श्रेणी एकची 57, श्रेणी दोनची 83 रुग्णालयांचा समावेश आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जनावरांना लाळ्या खुरकुताचे लसीकरण होते. यासाठी सुयांची गरज दाखवून खरेदीचा घाट घातला असला तरी अनेक ठिकाणी सुयांचा पुरवठा लसीकरणानंतर झाला; परंतु खरेदीच्या पावत्या, रकमा आधीच्या तारखेनेच दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकाराचा लाभ पशुपालकांऐवजी खरेदीतल्या साखळीलाच झाला. गुजरात सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला मोफत पुरवठा करावयाच्या सुयांच्या बॉक्‍सला किमतीचे स्टिकर लाऊन हा सर्व गोलमाल झाला नाही ना, असाही संशय आहे.

Web Title: Animal Breeding Department Gujrat Connection