सिम कार्डअभावी रखडली पशुगणना...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - पशुगणनेसाठी आयटी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय या वर्षी पशुसंवर्धन विभागाने घेतला. यासाठी प्रगणकांना ६२३ टॅब देण्यात आले. मात्र, नेटवर्क कनेक्‍टिव्हिटीसाठी सिम कार्डच मिळाले नसल्याने राज्यभरात पशुगणना अद्याप सुरू होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, एक ऑक्‍टोबरपासून पशुगणनेला सुरवात करा, असे आदेश खुद्द पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून सिम कार्ड न देताच देण्यात आले आहेत. यामुळे प्रगणकही संभ्रमात पडले आहेत. 

दुग्धोत्पादन वाढीसाठीचे, औषधोपचाराचे, पशुधन वाढीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने दर पाच वर्षांनंतर पशुगणना करण्यात येते. यंदा साडेसहा वर्षांनंतर कसाबसा पशुगणनेला मुहूर्त मिळाला, मात्र त्यातही सिम कार्डचे विघ्न आले. वर्ष २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली होती. एक ऑक्‍टोबर २०१८ पासून सर्वत्र पशुगणनेला सुरवात करण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून देण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड व परभणी या चार जिल्ह्यांत ६२३ प्रगणकांमार्फत पशुगणना करण्यात येणार आहे. आयुक्‍तालयातर्फे ६२३ टॅब प्रगणकांना वितरित करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप ग्रामीण भागात कोणत्या कंपनीच्या सिम कार्डला नेटवर्क कनेक्‍टिव्हिटी आहे हेच ठरत नसल्याने सिम कार्ड देण्यात आले नसल्याचे आणि यासाठी ई-टेंडरिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

पशुगणना यासाठी आवश्‍यक... 
  पशुसंवर्धन विभागाचे संपूर्ण नियोजन पशुगणनेवरच अवलंबून.
 दूध, मांस, अंडी, लोकर आदींपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज घेणे.
 मानवी आहारात लागणाऱ्या घटकांच्या उपलब्धतेचा अंदाज घेऊन नियोजन करणे.
  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पशुपालनाचा पर्याय 
उभा करणे.
 मांस निर्यातीपासून परकीय चलन मिळण्यासाठी पशुधन वाढविण्याचे नियोजन करणे.

Web Title: Animal counting wating for SIM card