esakal | जालना : पशुधन चोरीची डोकेदुखी; रात्री वाहनाच्या तपासणी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Theft is from women in Pimpri chinchwad Pune

जालना : पशुधन चोरीची डोकेदुखी; रात्री वाहनाच्या तपासणी वाढ

sakal_logo
By
उमेश वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पशुधन चोरी गेल्याची एक ते दोन दिवसांआड एक तरी पोलिस ठाण्यात तक्रारी येत आहेत. त्यामुळे पोलिसांना ही इतर गुन्ह्यांप्रमाणे पशुधन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे पशुधन चोऱ्या रोखण्यासाठी रात्री वाहनांच्या तपासणीसह ग्रामसंरक्षण दल स्थापन करून रात्री गस्त करण्याची वेळ आली आहे.

जालना शहरात मोकाट जनावराचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. याकडे नगरपालिका व वाहतूक शाखा दुर्लक्ष करीत आहे. मात्र, आता शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांसह जिल्ह्यातील पशुधनावर चोरटे डल्ला मारत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. आज घडीला पशुधनाच्या किंमती वाढल्याने रात्रीच शेतातील गोठ्यात बांधलेले पशुधन चोरी होण्याच्या घटना या पूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत. विशेष म्हाजने मागील काही महिन्यांपासून पशुधन चोरीच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात ही पशुधन चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा: माजलगाव : सख्ख्या भावाने केला सख्ख्या भावाचा खुन

त्यामुळे पोलिसांना इतर गुन्ह्यांप्रमाणे पशुधन चोरीचा शोध घेण्याची वेळी आली आहे. तसेच पशुधन चोरी रोखण्यासाठी रात्री वाहनाची तपासणी करण्यासह गावागावात ग्रामसंरक्षण दल स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे पशुधनाचे चोरट्यांपासून संरक्षण करण्यासाठी पोलिसांसह ग्रामसंरक्षण दला गावागावात रात्र जागून काढ असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील पशुधन चोरीचे काही प्रकार या पूर्वी पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील पशुधन चोरी करणारी टोळी अटक केली होती.

हेही वाचा: लातूरात पालकानेच केला तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पशुधन चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस ठाण्यात अंतर्गत सुमारे 50 ग्राम संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहेत. तसेच रात्री पोलिसांकडून वाहनांची तपासणी ही केली जात आहे. जालना शहरातील रस्तावरील मोकाट पशुधन व घनसावंगी तालुक्यातील पशुधन चोरीचे वाढल्याचे चित्र आहे.हे रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोकाट पशुधन सोडणाऱ्या मालकांची बैठक घेतली जाईल.

-विनायक देशमुख, पोलिस अधीक्षक, जालना.

loading image
go to top