आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे बँकेकडुन मंजुर

नेताजी नलवडे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

वाशी  : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे बँकेकडुन प्राधान्य क्रमाने मंजुर करण्याच्या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्यावतीने येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकारी यांना सोमवार (ता.१३ ) देण्यात आले आहे.

वाशी  : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे बँकेकडुन प्राधान्य क्रमाने मंजुर करण्याच्या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्यावतीने येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखाधिकारी यांना सोमवार (ता.१३ ) देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठा समाजातील आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने  आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना २९ आँगस्ट १९९८ ला केलेली आहे. २१ नोव्हेबंर २०१७ ला महाराष्ट्र शासनाने या महामंडळा अंतर्गत व्याज परतवा योजना सुरु केलेली आहे. यासाठिचे कर्ज प्रकरणे आपल्या बँकेच्या शाखेत आमच्या मराठा समाजातील तरुण बांधवाकडुन दाखल करण्यात आलेली आहेत.

आमचा मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहे. त्यामुळे या तरुनाना समाजात सक्षमपणे उभे राहाण्यासाठी आपल्या बँकेच्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. आण्णासाहेब पाटिल आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत दाखल कर्ज प्रकरणासाठी बँकाकडुन तारण व गँरटी मागण्यात येत होती. त्यामुळे सदरील कर्ज प्रकरणे मंजुर होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जाला बँकेला लागणारी गॅंरटी आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळ म्हणजेच राज्य शासनाची हमी देण्याचा महत्वपुर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या बँकेत महामंडळा अंतर्गत दाखल कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली काढुन सर्व कर्ज प्रकरणे मंजुर करण्यात यावेत.निवेदनावर नितिन घुले सुरज नाईकवाडी अमोल माने बाळकृष्ण माने हेमंत कवडे दत्ताञय कागदे अक्षय दळवे विकास बोराडे संग्राम नन्नवरे शंकर फुलारे उमेश येडे आदिंच्या सह्या आहेत.

Web Title: Annasheb Patil Financial Development Corporation loan approve