मतदार यादीतील नाव नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

तानाजी जाधवर
रविवार, 14 जुलै 2019

उस्मानाबाद - मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार (ता. 15 ) पासुन त्याची प्रक्रिया सुरु होत असल्याने आतापासुनच राजकीय पक्षांना मतदार नोंदणी करण्यासाठी झटावे लागणार आहे. 

उस्मानाबाद - मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार (ता. 15 ) पासुन त्याची प्रक्रिया सुरु होत असल्याने आतापासुनच राजकीय पक्षांना मतदार नोंदणी करण्यासाठी झटावे लागणार आहे. 

निवडणुक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुका विचारात घेऊन एक जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रम मतदार नोंदणी करण्यासाठी आदेश दिले आहे. ज्या लोकांची नोंदणी झालेली नाही, अशा वंचित नागरीकांना मतदार नोंदणीसाठी एक संधी मिळावी व त्यांचा मतदार यादी समावेश व्हावा यासाठी ही प्रक्रिया हाती घेण्यात आली. प्रारुप मतदार याद्याची प्रसिध्दी 15 जुलैला होणार असुन त्यावर दावे व हरकती स्विकारण्यास त्याच दिवसापासुन सुरुवात होणार आहे. या हरकती 30 तारखेपर्यंत स्विकारल्या जाणार आहेत. विशेष मोहीमा देखील राबिवल्या जाणार आहेत. त्यासाठी तारखा देखील जाहीर केल्या असुन 20, 21 ,27 व 28 जुलै या चार दिवसामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.

पाच ऑगस्टपर्यंत पर्यवेक्षक तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारे मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडुन त्याची तपासणी कऱण्यात येणार आहे. दावे हरकती निकाली काढण्यासाठी 13 ऑगस्ट हा दिवस ठरविण्यात आला आहे.  

उपजिल्हानिवडणुक अधिकारी, जिल्हा निवडणुक अधिकारी, मतदार यादी निरिक्षक यांच्याद्वारे मतदार यादीची विशेष तपासणी, तसेच डाटाबेसचे अद्यवतीकरण, पुरवणी याद्याची छपाई ही 16 ऑगस्टपर्यंत करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.  

19 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी निवडणुक विभागाने तारीख जाहीर केली आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द कऱण्यापुर्वी यादीतील तांत्रीक दोष दुर करण्याबाबत काळजी घेण्यात यावी, या शिवाय मतदार यादीमध्ये शंभर टक्के फोटो उपलब्ध होतील असे आदेश निवडणुक विभागाने दिलेले आहेत. निवडणुक विभागाच्या मानकानुसार असलेले ओळखपत्र व ओळखपत्राचे क्रमांक यांचे विश्लेषण कऱण्यात यावे, तसेच लोकसभा निवडणुकाच्या कालावधीत उपलब्ध असलेल्या अंतिम मतदार यादी व 30 जुन 2019 रोजीच्या मतदार यादीच्या शुध्दीकरणासंदर्भातील विश्लेषण करण्यात येऊन त्यातील तफावती दुर करण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश निवडणुक विभागाने दिलेले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcing another special concise revision program for voter lists