परभणीत आणखी एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

राजेश काटकर
सोमवार, 4 जून 2018

रसाळ यांनी नापिकी, कमी जमिन व कर्जाला कंटाळून गळफास लावून घेतला. देना ब्ँकेचे एक लाख रूपयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होेते. त्यांच्या पश्चात तीन मुली व पत्नी असे कुटुंब आहे. 

परभणी : राज्यभरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र चालू असताना परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील पिंपळगाव ढगे गावात आज (ता. 4) आणखी एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. तुकाराम बाबुराव रसाळ असे त्यांचे नाव असून, ते अल्पभूधारक शेतकरी होते.

रसाळ यांनी नापिकी, कमी जमिन व कर्जाला कंटाळून गळफास लावून घेतला. देना ब्ँकेचे एक लाख रूपयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होेते. त्यांच्या पश्चात तीन मुली व पत्नी असे कुटुंब आहे. 

काही दिवसांपूर्वीच परभणीतील जिंतुर गावातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.

Web Title: another farmer suicide by hanging himself