इसिसशी संबंधीत आणखी एक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

औरंगाबाद -  इसिसशी संबंध व घातपात करण्याच्या संशयावरून मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या दहाव्या संशयिताला औरंगाबादेत आणून एटीएसच्या पथकाने त्याची कसून चौकशी केली. तलहा ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक (वय 24) असे या संशयिताचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 एटीएसच्या पथकाने यापूर्वी नऊ जणांना ताब्यात घेतले होते. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अबुबकरला रविवारी (ता. 27) जिल्हा न्यायालयातील विशेष दहशतवादविरोधी पथकाच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

अतिरिक्त सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी त्याला 15 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयात केली. घातपात करण्यात अबुबकरचा सहभाग होता. वेळोवेळी घेण्यात आलेल्या घातपातासंबंधीच्या बैठकीस त्याची उपस्थिती होती. घातपातासाठी वापरण्यात येणारे रसायन व इतर साहित्याबद्दल त्याला माहिती असून ते कुठे कुठे लपविले आहे याची माहिती त्याच्याकडून मिळेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. 

यावर अबुबकरचे वकील खिजर पटेल यांनी उर्वरित संशयितांना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अबुबकरलादेखील पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती न्यायालयाने ग्राह्य धरून त्याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
 
ग्रुपच्या बैठकीत वावर 
घातपाताच्या तयारीसाठी अत्यंत गोपनीय असलेल्या उम्मत-ए-मोहम्मदिया ग्रुपच्या बैठकीला तलहा ऊर्फ अबुबकर उपस्थित राहत होता. एटीएसच्या पथकाने त्याच्याकडून एक लॅपटॉप, एक टॅब व मोबाईल तसेच सिमकार्ड जप्त केले आहे. त्याच्याकडून रसायन व कटाची माहिती पथक मिळवीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
मुंबई, ठाण्यासह औरंगाबादेत बैठका 
जलकुंभात विषारी रसायन मिश्रणाचा, तसेच समारंभात स्फोट घडवून घातपाताचा कट संशयितांनी रचला होता. या ग्रुपमधील सदस्यांच्या गुप्त बैठका सुरू होत्या. त्या मुंबई, ठाणे व औरंगाबादेत झाल्या असा संशय आहे. या प्रकरणाशी आणखी काही संशयितांना एटीएस ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Another suspect related to ISIS Arrested in Mumbra