एक लाखाची लाच घेणारा लिपीक जाळ्यात 

एक लाखाची लाच घेणारा लिपीक जाळ्यात 

नांदेड : मंजूर झालेली पेन्शन व सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम काढून देतो म्हणून एक लाखाची लाच घेणारा लिपीक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई मालेगाव रोड, तरोडा नाका परिसरात बुधवारी (ता. 24) दुपारी एका बँकेसमोर केली. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या कोषागार कार्यालयात पेन्शन विभागात कार्यरत असलेला वरिष्ठ लिपीक गंगाधर मोघलाजी कोत्तापल्ले (वय 44) याच्याकडे एक तक्रारदार गेले. तक्रारदाराच्या आईच्या नावे मंजूर झालेली पेन्शन फरकाची रक्कम आणि सहाव्या वेतन आयोगाकडून फरकाची रक्कम मंजूर करून साहेबांकडून काढून देतो, यासाठी एक लाखाची मागणी केली. मात्र ही लाच देऊ न ईच्छिणाऱ्या तक्रारदार यांनी 16 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

यावरून पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांनी आपल्या पथकासह सापळा लावून पडताळणी केली. यात लाच घेण्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी (ता. 24) मालेगाव रोडवर असलेल्या एसबीआय, शाखा नेरली या बँक परिसरात सापळा लावला. तक्रारकर्त्याकडून रोख एक लाख रुपये घेतांना डीवायएसपी विजय डोंगरे यांनी स्वत: रंगेहात अटक केले. त्याच्या विरूध्द भाग्यनगर ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com