लाच मागितल्याप्रकरणी अभियंत्याविरुद्ध गुन्हा, हवे होते ४० हजार

लाच घेताना पकडले
लाच घेताना पकडलेMedia Gallery

लातूर : चाळीस हजारांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी अभियंता ज्ञानदेव प्रल्हादराव गुडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) गुरुवारी (ता.२९) ही कारवाई केली. गुडे हे जिल्हा परिषदेच्या (Latur Zilla Parishad) यांत्रिकी उपविभागात शाखा अभियंता आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक माणिक बेद्रे यांनी सांगितले, की तक्रारदाराच्या गावातील जुन्या पाच विंधनविहिरींवर वीजपंप बसवण्यात आले. या कामासाठी सात लाख ४० हजार रुपये खर्च झाला. या कामाची एमबी तयार करून बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता गुडे यांनी तक्रारदाराकडे साठ ते ६५ हजार रुपये लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने २७ जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या विभागाच्या पथकाने याच दिवशी लाच मागणीची पडताळणी केली. (anti corruption burau nabbed latur zilla parishad engineer glp88)

लाच घेताना पकडले
गावी निघालेल्या तरुणाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

त्यावेळी गुडे यांनी लाच मागितल्याचे, तडजोडीअंती चाळीस हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा लावला. तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागात गेले असता गुडे यांनी लाच घेण्याचे जाणूनबुजून टाळले. लाच मागितल्या प्रकरणी गुडे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधिक्षक बेद्रे, निरीक्षक कुमार दराडे, निरीक्षक बाबासाहेब काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com