‘त्या’ आंटीला न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

बीड, - शहरातील जुना धानोरा रोड भागातील एका शाळेसमोर कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीला बुधवारी (ता. २३) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २२) या कुंटणखान्यावर छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली होती. 

शहरातील जुना धानोरा रोड भागातील एका शाळेसमोरील निवृत्त शिक्षकाच्या घरी किरायाने राहणारी महिला कुंटणखाना चालवीत होती. शिवाजीनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका पंटरच्या साहाय्याने याची खातरजमा करून येथील वेश्‍या व्यवसाय उघड केला होता. आंटीला अटक करून पिटा कायद्यानुसार गुन्हा नोंद करीत दोन पीडितांची सुटका केली होती. दरम्यान, या आंटीला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

पंचशीलनगर भागाची जाणीवपूर्वक बदनामी
दरम्यान, हा प्रकार जुना धानोरा रोड भागातील संत कबीरनगर भागातील शाळेसमोर घडला आहे. काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणीवपूर्वक तो पंचशीलनगर भागात घडल्याची माहिती समाज माध्यमांत पसरवली. या भागात सुसंस्कृत लोक राहत असून अशा प्रवृत्तींना कधीही थारा दिला गेला नाही. मात्र, या भागात सदरील प्रकार घडल्याच्या चुकीच्या प्रचारामुळे वेदना झाल्याची भावना या भागातील युवकांनी व्यक्त केली.

Web Title: Anty judicial custody beed