ॲप डाऊनलोड करताय, सावधान!

ॲप डाऊनलोड करताय, सावधान!

औरंगाबाद - पूर्वी केवळ संवादाचे माध्यम असलेला फोन आता ‘स्मार्ट’ झाला. बॅंकेत पैसे भरण्यापासून ते शॉपिंग, बिल पेमेंटसह इतर व्यवहार आता स्मार्टफोनवर होत आहेत. त्यासाठी प्ले स्टोअर्समध्ये वेगवेगळे ॲप आहेत; मात्र यातील अनेक ॲप हे बनावट असून, ते डाऊनलोड केल्यानंतर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कुठलेही ॲप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगणे आवश्‍यक झाले आहे; अन्यथा काही मिनिटांत आपले बॅंक खाते रिकामे होऊ शकते. यासाठी हॅकर्सची टोळी सक्रिय झाली असून, बॅंकांतर्फे ग्राहकांना सतर्क केले जात आहे.  

नोटाबंदीनंतर ऑनलाइन बॅंकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंका; तसेच खासगी बॅंकांनी विविध ॲप ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे बहुतांश ग्राहक ॲपच्या माध्यमातून बॅंकेचे व्यवहार करीत आहेत. आता या सर्व ग्राहकांसाठी धोक्‍याची घंटा जारी करण्यात आली आहे. मोबाईलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे ॲप उपलब्ध करण्यात आले आहेत; मात्र हे सर्व ॲप आता ग्राहकांना डोखेदुखी ठरत आहेत. बहुतांश ॲप तुमच्या मोबाईलमधील अन्य ॲप्लिकेशनची माहिती हाताळण्याची परवानगी मागतात. 

यामुळे तुमची खासगी माहिती त्यांनी सहज मिळते. तसेच तुम्ही वापरत असलेले ऑनलाइन पेमेंट ॲपमध्ये उपलब्ध असलेले तुमचा खाते क्रमांक, पासवर्ड, एसएमएससारख्या महत्त्वाच्या गोष्टी सहजरीत्या मिळवल्या जातात. याचा वापर करून तुमच्या बॅंक खात्यातील रक्‍कम काढली जाऊ शकते.

बॅंकांनी केले सतर्क 
सध्या ‘एनी डेस्क’ या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन लूट केली जाते. एकदा मोबाईल ग्राहकाने या ॲपला विविध माहिती हाताळण्याची परवानगी दिल्यानंतर पेमेंट ॲपची माहिती, आयडी आणि पासवर्ड रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर युझरच्या फोनवर ९ अंकांचा ॲप कोड जनरेट केला जातो. यानंतर हॅकर्स बॅंकेच्या नावावर माहिती मागतात आणि एकदा का ग्राहकांनी हा नंबर दिला, की त्यांचे खाते कंगाल झाले म्हणून समजा. त्यामुळे एनी डेस्कसह मोबाईलमधील इतर माहिती हाताळण्याची परवानगी मागणारे सर्व ॲप डिलीट करावे, अशी सूचना बॅंका ग्राहकांना देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com