हुकुमशहा आता पुन्हा नको, सजग रहा - डॉ. गणेश देवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मार्च 2019

लातूर - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा", असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी रविवारी येथे केले. नागरिकांच्या हक्कांसाठी, संविधान बचावासाठी दिल्लीत आता भूकंप होण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या वतीने आयोजित संविधान गौरव परिषदेत डॉ. देवी यांनी भारतीय संविधान: भटके विमुक्त, बहुजन आणि आजचे वास्तव' या विषयावर संवाद साधला. या वेळी साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख धनाजी गुरव, समाजवादी नेते मनोहर गोमारे, डॉ. शिवाजी जवळगेकर, संघटनेचे प्रदेश नेते सुधीर अनवले उपस्थित होते.

डॉ. देवी म्हणाले, "गेल्या पाच वर्षांत सरकारने स्वतःची गुर्मी वाढवली. झुंडशाही, झोडपशाही वाढवली. शेतकऱ्यांची अवहेलना केली. लोकांना होणाऱ्या यातनांकडे लक्ष दिले नाही. लोकांना खोटी स्वप्ने दाखवली. सतत खोटी आश्वासने दिली. ही काय राज्य करायची पद्धत आहे? या कारणामुळे माझा तुम्हाला विरोध राहील, असे म्हणण्याची हिंमत दाखवा. मनुस्मृती माथी बसण्याआधी संविधानावर विश्वास असणाऱ्यांना पुढे आणा. घाबरू नका. निर्भय बना.

आपल्या देशात 12 कोटी भटके विमुक्त आहेत. त्यांच्या नागरी हक्काला कात्री लावली जात आहे. उत्तर पूर्वेकडील देशातही असेच सुरु आहे. अशा छोट्या छोट्या घाणेरड्या युक्त्या करून सरकार नागरिकत्वाचे हक्क कमी आहे. हे सरकार दिल्लीत बसून संविधान बदलण्यापेक्षा अशा घटनांतून संविधान बदलत आहे. त्यामुळे आपण जागरूक राहायला हवे, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.

संविधान नाकारणारे देशद्रोही
गुरव म्हणाले, कोण कुठल्या जातीत जन्मला यापेक्षा कोण कुठल्या विचाराने जगला, हे जास्त महत्वाचे आहे. माणूस प्रतिगामी किंवा पुरोगामी नसतो. त्याचे विचार असतात. पण ज्यांचा विचारांवर विश्वास नाही असे लोक माणसांना संपवत आहेत. संविधान नाकारून त्यांना या देशात मनुस्मृतीचे राज्य आणायचे आहे. मग संविधान नाकारणारे देशद्रोही आहेत की स्वीकारणारे? याचा आपण नीट विचार केला पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to senior thinkers Dr. Ganesh Devi on sunday in samvidhan gaurav parishad