शेतकरी जागर यात्रेत सहभागी होण्याचे सुकाणू समितीचे आवाहन

सुषेन जाधव 
बुधवार, 18 एप्रिल 2018

23 एप्रिल पासून हुतात्मा शेतकरी जागर यात्रा निघणार असून ही यात्रा 20 मे ला औरंगाबादेत येणार अशी माहिती बुधवारी (ता. 18) सी टू भवनात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

औरंगाबाद - शेती प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेलं सरकार अजूनही आश्वासनच देत आहे. त्यामुळे सरकारविरोधात सुकाणू समितीतर्फे 14 मे ला राज्यव्यापी जेलभरो सत्याग्रह करण्यात येणार आहे. त्याच्या तयारीचा भाग म्हणून 23 एप्रिल पासून हुतात्मा शेतकरी जागर यात्रा निघणार असून ही यात्रा 20 मे ला औरंगाबादेत येणार अशी माहिती बुधवारी (ता. 18) सी टू भवनात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता कन्नड तालुक्यातील चापाणेर येथे सुकाणू समितीची सभा होणार असून त्यानंतर सायंकाळी 7 पर्यंत जिल्ह्यातील हतनूर, टाकली राजेराय, माळी वडगाव, घेवरी, दावरवाडी येथे सभा होणार आहेत. सभेदरम्यान स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढा, नामांतरसह अन्य लढ्यात हुतात्मा झालेल्या आदरांजली वाहण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले. परिषदेला सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे, अॅड. मनोहर टाकसाळ, निवृत्त सुभेदार मेजर सुखदेव बन, सुग्रीव मुंढे, कॉ. भीमराव बनसोड, बुद्धप्रिय कबीर यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Appeal to the Steering Committee to participate in Farmers Jagar Yatra