अर्चना यांच्या अवयवदानातून दोघांना जिवदान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - ब्रेन हॅमरेजमुळे मेंदूचे कार्य थांबलेल्या बहिणीच्या अवयवदानातून शुक्रवारी (ता. पाच) दोघांना जिवदान मिळाले असून, अन्य दोघांना दृष्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे, भाऊबीजेला आपल्या लाडक्‍या भावांना ओवाळण्यासाठी आलेल्या बहिणीचा अचानक रक्‍तदाब वाढून ब्रेन हॅमरेज झाल्याने भावांसह कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, या बंधूंनी आपल्या बहिणीच्या अवयवदानातून चौघांच्या आयुष्यात आनंद फुलविला आहे. 

औरंगाबाद - ब्रेन हॅमरेजमुळे मेंदूचे कार्य थांबलेल्या बहिणीच्या अवयवदानातून शुक्रवारी (ता. पाच) दोघांना जिवदान मिळाले असून, अन्य दोघांना दृष्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे, भाऊबीजेला आपल्या लाडक्‍या भावांना ओवाळण्यासाठी आलेल्या बहिणीचा अचानक रक्‍तदाब वाढून ब्रेन हॅमरेज झाल्याने भावांसह कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, या बंधूंनी आपल्या बहिणीच्या अवयवदानातून चौघांच्या आयुष्यात आनंद फुलविला आहे. 

अर्चना सतीशकुमार श्रावक (रा. पुलगाव, वर्धा) यांनी एम. कॉम. बी. एड. असे शिक्षण घेऊन आपल्या गावीच खासगी शिकवणीचे वर्ग चालवत ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. दिवाळीचे लक्ष्मीपूजन आटोपून औरंगाबादेतील आपल्या सहा भाऊरायांना ओवाळणीसाठी त्या दाखल झाल्या. रात्री भाऊबीजेची तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र, अचानकपणे त्यांचा रक्‍तदाब वाढल्याने त्यांना उल्कानगरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराला त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. त्यातच त्यांच्या मेंदूचे कार्य थांबले.

डॉक्‍टरांनी नातेवाइकांना बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली. आता काहीही होणार नसल्याचे चित्र समोर आल्याने अर्चना यांचे पती सतीशकुमार श्रावक, मुलगा ऋतीक, भाऊ परेश कासलीवाल, निशांत कासलीवाल, अभिजित कासलीवाल, सुमित कासलीवाल, अनिकेत कासलीवाल, अक्षय कासलीवाल यांनी चर्चा करून अवयवदान करण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर रक्‍तदाब व अन्य बाबी नॉर्मल नसल्याने पुन्हा तपासण्या कराव्या लागल्या. त्याच वेळी झोनल ट्रान्सप्लांन्ट कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी याबाबत रक्‍तगटानुसार वेटिंग लिस्टप्रमाणे त्या त्या रुग्णालयाशी संपर्क साधला. बी. पॉझिटिव्ह रक्‍तगट असलेल्या अर्चना यांच्या दोन किडनी आणि दोन डोळेच उपयोगात येऊ शकतात, असे शुक्रवारी (ता. चार ) सकाळी दहाच्या सुमारास घोषित केले. त्यानुसार दुपारनंतर अवयवदान करण्यात आले. एक किडनी व दोन्ही डोळे कमलनयन बजाज हॉस्पिटलला तर दुसरी किडनी एमजीएम हॉस्पिटलमधील रुग्णास देण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून डायलेसिसवर असलेल्या 35 वर्षीय महिलेवर बजाज हॉस्पिटल येथे किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. दुसरी किडनी एमजीएममध्ये उपचार घेणाऱ्या 40 वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आली. दोन्ही किडनींचे सायंकाळपर्यंत प्रत्यारोपण केल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. सायंकाळी पाचच्या सुमारास कैलासनगर स्मशानभूमीत अर्चना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Archana donated organs

टॅग्स