GramPanchayatElection: ग्रामपंचायतीत उमेदवारीपुरता महिलाराज?

सुहास सदाव्रते
Sunday, 10 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून जालना तालुक्यात सर्वाधिक ८६४ महिला उमेदवार रिंगणात उभ्या आहेत.

जालना : जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायत निवडणुकीची लगीनघाई जोमात सुरु आहे. खुल्या प्रवर्गासह विविध मागासवर्ग प्रवर्गातील राखीव जागेवर जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा अधिक महिला रणांगणात उतरल्या आहेत. असे असले तरी निवडून आल्यावर महिलांना काम करण्याची पूर्ण मुभा दिली जाईल की पुन्हा पतिराज सत्तेचा गाडा हाकणार अशी चर्चा गावगाड्यात सुरू झाली आहे.

माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला, अल्पवयीन मुलीची पोलिसांकडे तक्रार

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी (ता.१५ ) मतदान होणार आहे. निवडणुकीत उमेदवार म्हणून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याही पुढे जात उमेदवारीत महिलाराज पाहायला मिळत आहे. विविध प्रवर्गानिहाय महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डात उमेदवारीनुसार आता प्रचाराने चांगलाच जोर धरला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून जालना तालुक्यात सर्वाधिक ८६४ महिला उमेदवार रिंगणात उभ्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. सध्या गावोगावी प्रचाराने चांगलीच रंगत वाढत आहे. निवडणुकीत महिला उमेदवार विजयी होतील त्यामुळे बदल होईल असे वाटत असले तरी प्रत्यक्ष निवडून आल्यानंतर सत्ता प्रक्रियेत खरेच महिला निर्णय घेता येईल का ? अशी चर्चा गावगाड्यात सुरू आहे.

अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप

कारण राखीव पदावर महिला निवडून येतात, परंतु नंतरचा कारभार मात्र ' पतिराज ' करतात, असे आतापर्यंतचे चित्र आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विविध महिलांच्या पदावर ' पतिराज ' कारभार हाकत आहे. त्यामुळे महिला उमेदवार निवडून आल्या तरी कारभार व निर्णय प्रक्रियेत संपूर्ण सहभाग असेल या बाबी अनेक गावगाड्याने अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या

दरम्यान महिला सक्षमीकरण धोरण राबविले जात आहेत. त्यामुळे महिलांसाठी शासनाने विशेष कृती कार्यक्रम राबवीत सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षा आदी पदावर कसे कार्य पार पाडावे, यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच निवडून आलेल्या महिलांच्या पतीना कारभारापासून दूर ठेवावे, असा सूर आता ग्रामीण भागातून निघू लागला आहे.

महिला नेहमीच विकासाचे राजकारण करतात. विविध पदांवर संधी आल्यानंतर 'पतिराज' कारभार करू नये. गाव असो जिल्हा, कारभार कसा प्रभावीपणे करावा याचे प्रशिक्षण शासनाने महिलांना द्यावे. त्यामुळे अधिक विश्वासाने महिला काम करतील.
- डॉ.सुनंदा तिडके, सदस्या,महिला तक्रार निवारण समिती,जालना 

 

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are Women Active Participation In Gram Panchayat? Jalna News