Vidhan Sabha 2019 : खोतकरांनी केला उमेदवारी अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी (ता. 1) दुपारी एकच्या सुमारास निवडणुक अधिकारी श्रीमंत हारकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

जालना : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी (ता. 1) दुपारी एकच्या सुमारास निवडणुक अधिकारी श्रीमंत हारकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या  समवेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, ओमप्रकाश चितळकर, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, जगन्नाथ काकडे, ए. जे. बोराडे राजेश सोनी आदींची उपस्थिती होती. भाजप

Vidhan Sabha 2019:भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

यावेळी रावसाहेब दानवे यांनी युतीच्या उमेदवाराचा विजय होणार असल्याचे सांगितले. तर, खोतकर यांनी राज्यात युतीच्या बाजूने वारे वाहत आहेत.त्यामुळे दोनशे वीस पेक्षा अधिक जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.केंद्राप्रमाणे राज्यातही विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही.

Vidhan Sabha 2019 : भाजपला झटका; विद्यमान आमदाराची तिकीट नाकारल्याने बंडखोरी?

काँग्रेसकडून श्रीमती गोरंट्याल यांचा उमेदवारी अर्ज माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनी दोन नामनिर्देशनपत्र सादर केल्याची माहिती निवडणुक अधिकारी श्रीमंत हारकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjun Khotkar filed nomination from bjp at Jalna