हुतात्मा किरण थोरात यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पालखेड/वैजापूर : औरंगाबादच्या वैजापुर तालुक्‍यातील शहीद जवान किरण थोरात यांच्यावर शुक्रवार (ता.13) रोजी फकिराबादवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरीकांची उपस्थिती होती. किरण यांच्या पत्नीचा आक्रोश आणि चार महिन्याचा मुलगा श्‍लोक याला बघुन सर्वांचे मन हेलावले. सुभेदार कदम, कॅप्टन साकेश शर्मा यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर भारतीय सैन्य दलातर्फे किरण थोरात यांना मानवंदना देण्यात आली. 

यावेळी जिल्हाधिकारी, अधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. जम्मु काश्‍मीर मधील कृष्णाघाटी भागात शस्त्रसंधीचा भंग करुन पाकीस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात किरण थोरात (31) हे शहीद झाले होते.

Web Title: Army jawan kiran thorat cremated with military honours at vaijapur