पाटोद्याच्या आठवडी बाजारातून व्यापाऱ्याचे पावणेदोन लाख लुटले

सुधीर एकबोटे
गुरुवार, 5 जुलै 2018

त्यांच्या संपूर्ण अंगावर लाल चट्टे उठून खाज सुरु झाली. याच गोंधळाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कडील एक लाख ८० हजर रक्कम असलेली पिशवी हिसकावत क्षणातच तेथून पोबारा केला.

पाटोदा (जि. बीड) -  आठवडी बाजारात भर दिवसा व्यापाऱ्याच्या अंगावर विशिष्ट द्रव टाकून त्याच्याकडील पावणेदोन लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी (ता. पाच) घडली.  या घटनेमुळे पाटोदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पाटोदा येथे गुरुवारी आठवडी बाजार असल्यामुळे सर्वत्र गर्दी असते येथील सचिन गाडेकर यांच्या वडिलांचा बाजारात धान्याचा व्यापार आहे. सचिन हे सकाळी ११ वाजता काही कामानिमित्त बाजारात आपल्या वडिलांकडे गेले. यावेळी त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची रक्कम होती. एक लाख ऐंशी हजर रुपये पिशवी मध्ये तर सत्तर हजर रुपयांची रक्कम खिशात होती. यावेळी अचानक अज्ञात व्यक्ती ने त्यांच्या अंगावर विशिष्ट द्रव टाकले. यानंतर त्यांच्या संपूर्ण अंगावर लाल चट्टे उठून खाज सुरु झाली. याच गोंधळाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कडील एक लाख ८० हजर रक्कम असलेली पिशवी हिसकावत क्षणातच तेथून पोबारा केला. काही कळायच्या आत मध्येच प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी भर दिवसा ही लुटीची घटना घडली. आठवडी बाजारात अनेकवेळा या पूर्वीही मोबाईल व दागिने चोरीच्या घटना घडल्या असून या मोठ्या घटनेमुळे पाटोदा पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: around two lakhs get stolen of trader in patoda market beed