नांदेड : अल्पवयीन चोरट्यास अटक 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नांदेड : भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतून घरासमोर लावलेल्या सायकली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल पळविणारा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून १३ सायकली आणि १४ किंमती मोबाईल असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

नांदेड : भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतून घरासमोर लावलेल्या सायकली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल पळविणारा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून १३ सायकली आणि १४ किंमती मोबाईल असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के यांनी पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांना सायकल, मोबाईल, घरफोडी आदी दाखल गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या. यावरून त्यांनी फौजदार चित्तरंजन ढेमकेवाड यांना सांगितले. श्री. ढेमकेवाड यांनी शेख फय्याज, समद पठाण, शिवराज गोमारकर, वैजनाथ पाटील, सचीन गायकवड, विलास कदम आणि बाजीराव ढोले यांना सोबत घेऊन आप्या हद्दीत गस्त घालण्यास सुरूवात केली. तरोडा नाका भागात बुधवारी (ता. १४) रात्री गस्त घालत असतांना त्यांनी एका संशयीत अल्पवयीन तरूणास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानी सायकलीव व मोबाईल चोरीची कबुली दिली. तो एकटाच चोरी करीत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता चोरलेल्या तेरा वेगवेगळ्या कंपनीच्या सायकली आणि १४ अँड्रॉईड मोबाईल असा एक लाख ९३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याची रवानगी बाल निरीक्षण गृहात केली आहे. त्याच्याकडन अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी व्यक्त केली. 

घरात असलेल्या किंमती वस्तु, सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी व सायकली सुरक्षीत ठिकाणी लावाव्यात. तसेच अपार्टमेंटमध्ये आणि आपल्या घरी सीसीसटीव्ही कॅमेरा बसवावेत. वॉचमन किंवा आपण रात्रीच्यावेळी सजग रहावे असे आवाहन नागरिकांना उपविभागीय पोलिस अधिकारी अक्षिजीत फस्के यांनी केले आहे. 

Web Title: arrested a minor thief