नांदेड : शेळ्या चोरांना अटक; आठ शेळ्या जप्त 

प्रल्हाद कांबळे 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

जंगलात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या चोरून नेणारी टोळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. टोळीतील तिघांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : जंगलात चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या चोरून नेणारी टोळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. टोळीतील तिघांवर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्लाळ (ता. नांदेड) येथील काशिनाथ भोरगे (वय ६०) आणि त्यांचा पुतन्या संदीप ग्यानु भोरगे हे दोघेजण बुधवारी (ता. १४) रोजी कल्लाळ शिवारातील शेताकडे, गोदावरी नदी किनारी शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले. नदीकाठी शेळ्या चरत असताना त्यांची नजर चुकवून झुडपाआड लपून काशिनाथ भोरगे यांच्या दोन शेळ्या व संदीप भोरगे याच्या सहा शेळ्या चोरून नेल्या. सायंकाळी घरी येऊन पहातात तर आठ शेळ्या कमी होत्या. परत त्यांचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले. सर्वत्र भोरगे परिवारांनी शोध घेतला मात्र शेळ्या आढळल्या नाहीत.

त्यानंतर शुक्रवारी (ता. १६) इतवाराच्या आठवडी बाजारात शोध घेतला. यावेळी जिलानी हबीब याच्याकडे दोन शेळ्या दिसल्या. त्याला विचारले असता तो म्हणाला की, तीन शेळ्या दादाराव ग्यानबाराव कदम यांनी आणून दिल्या. मी त्यांना विक्री करून देत आहे. दादाराव यास विचारले असता त्याने सांगितले माझ्याकडे आठ शेळ्या आहेत. त्या शेळ्या श्रीकांत दिलीप मोरे आणि जनादर्धन अर्जून गोडबोले यांनी बुधवारी (ता. १४) रात्री अकराच्या सुमारास आणून दिल्या. यावेळी भोरगे यांनी नांदेड ग्रामिण पोलिसांना बोलावून घेऊन आठ शेळ्या व जनार्धन अर्जून गोडबोले रा. दगडगाव (ता. लोहा), श्रीकांत दिलीप मोरे रा. टेळकी (ता. लोहा) आणि दादाराव ग्यानबाराव कदम रा. अकोली ता. वसमत (जि. हिंगोली) या तिघांना अटक केली. काशिनाथ भोरगे यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार शेख जावेद हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrested thief gang who theft goat