आंतरराष्ट्रीय सद्‍भावना बसयात्रेचे नांदेडला आगमन : video

फोटो
फोटो

नांदेड, ः श्री गुरु नानकदेवजी यांच्या ५५० व्या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने सर्व विश्वाला गुरु नानकदेवजी यांचा शांतीसंदेश देण्यासाठी कॅनडा (नॉर्थ अमेरिका) येथून एकवीस देशाचे भ्रमण करून सदभावना बस यात्रा नांदेडला पोहचली आहे. तसेच कॅनडा शासनाच्या पर्यटन विभागाने या यात्रेला मंजुरी दिली असल्याची माहिती यात्रेचे प्रमुख जत्थेदार गुरुचरण सिंघ बनोत यांनी दिली.


या यात्रेचे गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूरसाहिब नांदेड येथे मंगळवारी (ता. २६) आगमन झाले. यात्रेचे स्वागत गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी डी. पी. सिंघ, कनिष्ठ अधीक्षक रविंदर सिंग कपूर यांनी केले. गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी या बस यात्रेला भेट देऊन यात्रेचे मुख्य आयोजक गुरुचरणसिंघ बनोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या यात्रेत श्रीमती सुरजीत कौर, रणजीत सिंघ खालसा, शिंगारासिंघ, दलजित सिंघ बक्षसिंघ, हरमिंदर सिंघ, जसबीर सिंघ, रेशमसिंग, मोहिंदर कौर यांचा समावेश आहे. या यात्रेचे प्रस्थान ता. २१ मे २०१९ रोजी नॉर्थ अमेरिका मध्ये सुरु झाले. येथून नंतर पाण्याच्या मार्गाने बस इंग्लडकडे पाठवली गेली. ता. ३१ आॅगस्ट रोजी इंग्लड मध्ये यात्रेला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी गुरु नानकदेवजी यांच्या मानवता आणि विश्व शांतीचा संदेश प्रसारित करण्यात आला. पुढे ही यात्रा फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, हॉलंड, स्वित्झरलॅंड, इटली, आस्ट्रिया, हंगेरी, टर्की, इराण आणि पाकिस्तानात पोहचली. येथे गुरु नानकदेवजी यांचे जन्मस्थान नानकाना साहेब येथे दर्शन करून यात्रा भारतात पोहचली. भारतातील सर्व मोठे गुरुद्वारे आणि मोठ्या शहरांना भेट देऊन यात्रा मंगळवारी (ता. २६) नांदेडला पोहचली. गुरुवारी (ता. २८) पहाटे ही यात्रा मुंबईकडे प्रस्थान करेल. कॅनडातील रहिवाशी आमिरखान प्रायोजक

गुरुचरण सिंघ बनोत यांनी या प्रसंगी सांगितले की, कॅनडा येथील रहिवाशी असलेले श्री आमिरखान यांनी या बसयात्रेच्या आयोजनात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी यात्रेसाठी आधुनिक प्रणालीची बस तयार करून दिली आहे. या यात्रेसाठी लागणाऱ्या इतर काही कार्यात त्यांनी दान स्वरूपात मदत देखील दिली आहे. गुरुचरणसिंघ यांनी त्यांचे विशेष आभार या मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com