मराठवााड्यात कृत्रिम पावसालाही अडथळा, उडाले नाही विमान

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद - पावसाने हात दाखविलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अमेरिकेहून विमान आले. मात्र, सोमवारी (ता. 19) सायंकाळपर्यंत डीजीसी क्‍लीअरन्सअभावी पावसासाठीचे विमान आकाशात झेप घेऊ शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत कृत्रिम पावसाच्या प्रयोगाविषयी कोणतीही हालचाल झाली नव्हती. 

मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठीची चाचणी झाल्यानंतर अपेक्षित ढगांचा अभाव व जे विमान आले होते ते परत गेल्यानंतर प्रयोगासाठी अमेरिकेहून विमान येणार असल्याची माहिती पुढे आली होती. हो - नाही म्हणत दाखल झालेले विमान सोमवारी (ता. 19) आकाशात झेपावणार असल्याची माहिती यंत्रणेच्या वतीने रविवारी (ता. 18) देण्यात आली होती. सुभेदारी येथे रविवारी दुपारी शास्त्रज्ञ आणि महसूल अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मराठवाड्यात रडारच्या साहाय्याने ढगांचा अभ्यास करूनच विमानाच्या उड्डाणाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला हवामान खात्याच्या विमानावर 9 ऑगस्टला सुरवात करण्यात आली होती. तीन दिवस कंपनीने विमान वापरल्यानंतर ते परत गेले; मात्र कंपनीचे प्रयोगासाठीचे विमान विदेशातच अडकलेले होते. अखेर शनिवारी (ता. 17) दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रयोगासाठी आवश्‍यक असलेले कंपनीचे विमान चिकलठाणा विमानतळावर आले. त्यानंतर सोमवारपासून प्रयोगास सुरवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते; परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत विमान डीजीसी क्‍लीअरन्सअभावी आकाशात उड्डाण घेऊ शकले नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी उशिरापर्यंत हे क्‍लीअरन्स प्राप्त होणे अपन्क्षित होते. ते आल्यानंतरच प्रयोगाविषयीची पुढची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com