मराठवाड्यात आजपासून कृत्रिम पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अमेरिकेहून आलेले विमान सोमवारी (ता. १९) आकाशात झेपावणार असल्याची माहिती आयएमडीचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी यांनी दिली.

औरंगाबाद - कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी अमेरिकेहून आलेले विमान सोमवारी (ता. १९) आकाशात झेपावणार असल्याची माहिती आयएमडीचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जे. आर. कुलकर्णी यांनी दिली. सुभेदारी येथे रविवारी दुपारी शास्त्रज्ञ आणि महसूल अधिकाऱ्यांची बैठक झाली. मराठवाड्यात रडारच्या साहाय्याने ढगांचा अभ्यास करून विमानाच्या उड्डाणाचा निर्णय घेतला जाणार आहे.

हवामान खात्याच्या विमानावर नऊ ऑगस्टला प्रयोगास सुरवात करण्यात आली होती. तीन दिवस कंपनीने विमान वापरल्यानंतर ते परत गेले; मात्र कंपनीचे विमान विदेशातच अडकलेले होते. अखेर शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रयोगासाठी आवश्‍यक असलेले कंपनीचे विमान चिकलठाणा विमानतळावर आले. आता सोमवारपासून प्रयोगास सुरवात करण्यात येणार आहे. प्रयोगाचे संपूर्ण नियंत्रण शास्त्रज्ञांच्या हाती आहे. विभागीय प्रशासनाने या सगळ्या प्रकारावर मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांशी चर्चा करून नेमके काय चालले आहे, याची माहिती घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial rain in Marathwada from today