कृत्रिम पाऊस पाडणारे विमान येणार आज 

file photo
file photo

औरंगाबाद: दुष्काळीग्रस्त मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठीचे विमान शनिवारी (ता.17) औरंगाबादेत दाखल होणार आहे. विमान आल्यानंतर या प्रयोगास प्रारंभ होणार आहे. 52 दिवस कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार होता. आता तो 30 दिवसच होणार असल्याची माहिती पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. 


मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सोलापूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे (आयआयटीएम) विमान ट्रायलसाठी आणण्यात आले होते. पाऊस पाडणारे विमान हे विदेशातच होते. यांची माहिती "सकाळ'ने उघड केली होती.

सोलापूरच्या विमानाने नुसतीच मराठवाड्यात ट्रायल करण्यात आली. यात एकही दिवस पाऊस पडला नसल्याने ते विमान परत पाठविण्यात आले. राज्य सरकारने 31 कोटी रुपयांची तरतूद करून राज्यातील अवर्षणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यात 52 दिवस प्रयोग होणार होता; मात्र पाणीपुरवठामंत्र्यांनी हा प्रयोग 30 दिवस होणार असल्याची घोषणा करीत खळबळ उडवून दिली.

30 कोटी रुपयांत 52 दिवस कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार असल्याचे शास्त्रज्ञांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते; मात्र मंत्री लोणीकर यांनी शुक्रवारी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या कंपनीचे विमान शनिवारी (ता.17) येईल, ते 30 दिवस प्रयोग करतील. पाऊस पडण्याची हमीही कंपनीने घेतल्याचे वक्‍तव्य केले.

त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे 52 चे 30 दिवस कसे झाले, मग पैसेही कमी होणार का, की कंपनीवर सरकार मेहेरबान झाले, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com