'परिवर्तनवादी चळवळीला बोथट करण्याचे काम सुप्तपणे सुरू '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

अहमदपूर - परिवर्तनवादी चळवळीची ताकद वेगवेगळ्या मार्गांनी बोथट करण्याचे काम सुप्तपणे सुरू असून, जात, धर्म जाणीव घट्ट करणारा विचार पुढे येत आहे. याविषयी आत्मपरीक्षण करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत विचारवंत अरुण रेणके यांनी व्यक्त केले. 

अहमदपूर - परिवर्तनवादी चळवळीची ताकद वेगवेगळ्या मार्गांनी बोथट करण्याचे काम सुप्तपणे सुरू असून, जात, धर्म जाणीव घट्ट करणारा विचार पुढे येत आहे. याविषयी आत्मपरीक्षण करण्याची आवश्‍यकता असल्याचे मत विचारवंत अरुण रेणके यांनी व्यक्त केले. 

क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या 31 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (ता. 19) राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वितरण व "परिवर्तनवादी चळवळीसमोरील आव्हाने ः एक चिंतन' या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी "लसाकम'चे माजी महासचिव बालाजी थोटवे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून "लसाकम'चे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. राजकुमार मस्के, प्रा. डॉ. भगवानराव वाघमारे यांची उपस्थिती होती. 

व्यासपीठावर लसाकमचे महासचिव नरसिंग घोडके, मराठवाडा अध्यक्ष राजकुमार नामवाड, मराठवाडा सचिव निरंजन तपासकर, माजी लसाकम उपाध्यक्ष उत्तमराव अवचार, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. राजाराम वाघमारे, प्रा. डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, नामदेवराव विराळे, दिलीपराव देवकांबळे यांची उपस्थिती होती. 

श्री. रेणके म्हणाले, की जागतिकीकरणाची पहिली घोषणा प्रथमत: अण्णा भाऊ साठे यांनी केली होती. जगातील वंचितांना उद्देशून अण्णा भाऊंनी परिवर्तनवादी चळवळ आपल्या साहित्याच्या माध्यमातून चालविली; तसेच भौतिक सुखसुविधांची साधने प्राप्त झाली म्हणजे परिवर्तन झाले असे नव्हे, असेही ते म्हणाले. 

या वेळी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघातर्फे क्रांतिगुरू लहुजी साळवे समाजभूषण पुरस्कार बी. बी. गायकवाड (लातूर), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार के. एस. वाघधरे यांना, तर मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार अण्णासाहेब तोडे यांना देण्यात आला. 
प्रास्ताविक लसाकमचे महासचिव नरसिंग घोडके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मारुती बुद्रूक पाटील यांनी केले, तर आभार रमेश भालेराव यांनी मानले. 

कार्यक्रमासाठी लसाकमचे अध्यक्ष नरसिंग सांगवीकर, प्रा. बालाजी कारामुंगीकर, सुग्रीव बेले, बालाजी जंगापल्ले, मोहन कांबळे, राजकुमार गोंटे, ग्यानोबा घोसे, भाऊराव वाघमारे, उमाकांत सोनकांबळे, डॉ. गोविंद कलवले, पी. टी. कांबळे, प्रा. माधव माने, संजीवकुमार देवनाळे, गणेश वाघमारे, शिवाजी कांबळे, शरद कांबळे, प्रदीप तोगरे, मनोहर कवडेकर, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी नामपल्ले, किशन गायकवाड यांनी पुढाकार घेतला. 

Web Title: arun renke opinion