मुस्लिम, दलित वस्त्यांबद्दल प्रश्‍न विचारायचे नाहीत का? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

औरंगाबाद - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहे. मुंबईतील सभेत केलेल्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याच्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या तक्रारीवर असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील मुस्लिम, दलित वस्त्यांची स्थिती सांगत आम्ही प्रश्‍न विचारायचे नाहीत का? असा सवाल सोमवारी (ता. दोन) पत्रकार परिषदेत केला. 

औरंगाबाद शहरात एमआयएम नगरसेवकांच्या विकासकामांचे उद्‌घाटन करण्यासाठी ते शहरात आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओवेसी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीचा निर्णय चुकला आहे. किती काळा पैसा आहे, हे त्यांनी आता सांगावे. कॅशलेशवर धोरणावर त्यांनी टीका केली. राज्यातील भाजप सरकारने तत्काळ नियम करावा की दारू आणि सिगारेटचे व्यवहार पूर्णपणे कॅशलेश होतील. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रोख व्यवहार होणार नाहीत. मात्र, सरकार असे करणार नाही. कॉंग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढण्याची कार्यक्षमता संपली आहे. कॉंग्रेस नेहमीच एमआयएमचे नाव पुढे करून पराभव झाल्याचे सांगत आहे. एमआयएमने राज्यात फक्त 24 जागांवर उमेदवार दिले होते मग इतर ठिकाणी पराभव कसा झाला, असा प्रश्‍न त्यांनी केला. 

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा 
मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिमांना शैक्षणिक मागास निकषांवर आरक्षण देण्यास मान्यता दिली होती. राज्य शासनाने हे निर्देश मान्य करायला हवे. आम्ही धर्मावर आरक्षण मागत नाही तर मुस्लिम मागास असल्याचे सच्चर समिती, महंमद उर्र रहेमान समितीने म्हटले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या आरक्षणास पक्षाचा पाठिंबा राहणार आहे. 

न्यायालयाच्या दोन निर्णयांमुळे वाद होण्याची शक्‍यता 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओवेसी म्हणाले, की न्यायमूर्ती वर्मा यांच्या हिंदुत्व ही जीवनशैली असल्याचे सांगणाऱ्या निर्णयाचे पुनःपरीक्षण होईल असे वाटले होते. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेला निर्णय चार न्यायधीशांच्या पीठाने बहुमताच्या आधारे दिला असला तरी या निर्णयामुळे भविष्यात वाद होण्याची शक्‍यता आहे. मात्र निकाल पूर्ण वाचलेला नाही. त्यामुळे ते वाचल्यावर पूर्ण प्रतिक्रिया देऊ. 

Web Title: asaduddin owaisi press conference