आदिवासी क्षेत्रातील ‘आशा वर्कर’ आत्मदहनाच्या पाविञ्यात

नवनाथ येवले
शनिवार, 2 जून 2018

नांदेड : आदिवासी प्रवण क्षेत्राच्या किनवट तालुक्यातील ‘आशा वर्कर’ यांनी संपकाळात स्वखर्चातून आंगणवाडींना आहार पुरवठा केला. महिला बालविकास तालुका प्रकल्पाधिकाऱ्यांच्या आदेशाने वाटप करण्यात आलेल्या आहर भत्यासह थकित मानधनाच्या मागणीसाठी तालुक्यातील पन्नासवर ‘आशा वर्कर’यांनी प्रशासनास आत्मदहानाचा ईशार दिला आहे.

आगंणवाडी कर्मचारी संपकालावधीत २०१७ ला शासन आदेशानुसार आंगणवाडींचे कुलूप तोडून बालकांना तालुक्यातील ‘आशा वर्कर’ यांनी स्वखर्चातून महिनाभर आहार पुरठा केला. मानधनाची तमा नबाळगता केवळ बालकांच्या हक्कांसाठी कर्ज काढून आंगणवाडी स्तरावर आहार पुरठ्यासह काम केले. नियमीत ऐवजी कामाच्या स्वरूपानुसार मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनाचे संपकाळातील बजेट जाहिर करण्यात आले असले तरी अद्याप खात्यावर वर्ग करण्यात आले नाही. शासनस्तरावरून आदिवासी प्रवण क्षेत्रासाठी प्राधाऱ्यक्रमानुसार विषेश योजना राबवण्यात येत असल्यातरी थकित मानधनासह भत्याच्या मागणीसाठी तालुक्यातील पन्नासवर आर्शावर्कर यांना थेट आत्मदहनाचा मार्ग अवलंबावा लागल्याने प्रत्यक्षात वेगळे चित्र समोर अाले आहे.

आंगणवाडी कार्यकर्त्यांच्या संपकाळात तालुका प्रशासनाच्या आदेशानुसारकुलूप तोडून आहार कोठा प्राप्त नसताना स्वखर्चातून बालकांना आहार पुरवठाकेला. कर्जकाढून केलेल्या आहार पुरवठ्याच्या भत्या अभावी कौटुंबी समस्यावाढल्या आहेत. तालुकास्तरावर सातत्याने पाठपुरवा करूनही दूर्लक्ष केले जात आहे. शासनाच्या निष्क्रीय धाेरणामुळे माणसिक त्रास सहन करावा लागत असल्याने हे टाेकोचे पाउल उचलावे लागले

- निर्मला जोंधळे : अशा वर्कर संघटना जिल्हाध्यक्ष

Web Title: asha worrkar's in tribal areas will Autism