चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

नांदेड - पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी अडविल्यामुळे मागील काही वर्षांत हे धरण फार कमी वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता तीच अवस्था उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाची (इसापूर) होणार असून, हे टाळण्यासाठी या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात नव्याने सिंचन प्रकल्प उभारू नका; अन्यथा याही प्रकल्पाची जायकवाडीसारखी अवस्था होईल, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर जलसंपदामंत्र्यांना देखील त्यांनी निवेदन दिले आहे. नांदेडला नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीतही पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत खासदार अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करून याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर याबाबत सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
Web Title: ashok chavan letter to chief minister