वीर जवान वानोळे यांच्या पार्थिवास अशोक चव्हाणांकडून पुष्पचक्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

नांदेड : देशाच्या सीमा रक्षणासाठी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना नांदेड जिल्ह्यातील लोहगाव येथील वीर जवान विनोद वानोळे यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह विशेष विमानाने गुरु गोविंदसिंग विमानतळ नांदेड येथे शनिवारी (ता. 16) दुपारी आणण्यात  आला. यावेळी विमानतळावर त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहून माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी अभिवादन केले. 

खा.अशोक चव्हाण यांच्यानंतर आ.डी.पी.सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही पार्थिवास पुष्पचक्र अर्पण  केले. यावेळी उपमहापौर विनय गिरडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: ashok chavhan pay tribute to let army man vanole