esakal | मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदाचा मान बीडला, अशोक डक यांची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Dak

माजलगाव (जि.बीड) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच डक यांच्या माध्यमातुन ही संधी मिळाली आहे.

मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदाचा मान बीडला, अशोक डक यांची निवड

sakal_logo
By
कमलेश जाब्रस


माजलगाव (जि.बीड) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच डक यांच्या माध्यमातुन ही संधी मिळाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सभापती अशोक डक यांची ओळख आहे. मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अशोक डक यांनी २३५ विक्रमी मतांनी विजय मिळवुन निवडून येण्याचा मान मिळविला होता. मुंबई बाजार समितीचे संचालक म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, रेणुका, मी तुझा आता संजु काका, आईवडिलांचे छत्र...  

मागील चाळीस वर्षांपासुन पवार घराण्याशी श्री.डक हे एकनिष्ठ आहेत. माजी आमदार गोविंदराव डक हे १९८० साली शरद पवार यांच्या एस काँग्रेसमधून निवडुन आले होते. तेव्हापासुन ते पवार समर्थक आहेत. मागील पंधरा वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकनिष्ठ व खंदेसमर्थक म्हणुनही अशोक डक यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी यशस्वी सांभाळत त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील परळी वगळता सर्व विधानसभेचे उमेदवार हे राष्ट्रवादीचे निवडून आले होते. आज मुंबई येथे झालेल्या सभापतीपदाच्या निवडीमध्ये अशोक डक यांची सभापती म्हणून निवड झाली आहे.

झेंडूने बहरले आयुष्य, फुलशेतीतून दोन महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न

जिल्ह्याच्या ईतिहासात पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व
मुंबई बाजार समितीच्या सभापती पदाची संधी अशोक डक यांच्या माध्यमातुन बीड जिल्ह्याला मिळाली आहे. यापूर्वी मराठवाड्यातून परभणीचे रामप्रसाद बोर्डीकर यांच्या रूपाने मागील चौदा वर्षांपूर्वी मराठवाड्याला मुंबई बाजार समितीचे सभापती पद मिळाले होते. बोर्डीकर यांच्यानंतर मराठवाड्याला अशोक डक यांच्या माध्यमातुन देशाच्या आर्थिक राजधानीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. आमदार प्रकाश सोळंके, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांच्याशी असलेल्या एकनिष्ठेमुळे माजलगाव सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या अशोक डक यांना राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे.


(संपादन - गणेश पिटेकर)