अशोक गोविंदपूरकर यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

लातूर - महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या सर्वच पक्षांत इनकमिंग-ऑऊट गोइंग सुरूच आहे. त्यात गुरुवारी (ता. 29) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी "घड्याळा'ला दूर करीत कॉंग्रेसच्या "हाता'शी दोस्ती केली. त्यांनी माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख व माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. याच वेळी विद्यमान नगरसेविका दीप्ती खंडागळे यांनी रिपाइं (आठवले गट) या पक्षाला, तर नगरसेविका रहेना बासले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडून पक्षात प्रवेश देऊन हवा निर्माण केली जात आहे. यात कॉंग्रेसने गुरुवारी (ता. 29) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले. इतकेच नव्हे तर अनेकांना पक्षात प्रवेश देत कॉंग्रेसमध्येही इनकमिंग सुरू असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, नगरसेविका रहेना बासले यांनी त्यांच्या समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. रिपाइंच्या नगरसेविका दीप्ती खंडागळे यांनी लक्ष्मण खंडागळे, भारतीय जनता पक्षाचे शिरीष देवकते, शिवसेनेचे अनिल शिंदे, सूरज पांचाळ मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांना माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी प्रवेश दिला. 

चोवीस तासांचे "राम' 
कॉंग्रेसचे कार्यकर्ते व सराफ सुवर्णकार संघटनेचे प्रमुख राम चलवाड यांनी मंगळवारी (ता. 28) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. हा प्रवेश होऊन चोवीस तासही होत नाहीत, तोच श्री. चलवाड हे पुन्हा स्वगृही परतले आहेत. माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी गळाभेट करीत त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पक्षासाठी मात्र ते चोवीस तासांचेच "राम' ठरले. 

Web Title: Ashok govindapurakar to Congress