काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही - अशोक जगदाळे 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप अशोक जगदाळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुर्णपणे निवडणुकीमध्ये आपली ताकद लावली. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या लोकांनी विश्वासघात केल्याने आपला पराभव झाल्याची खंत त्यांनी उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर व्यक्त केली. 

बीड - काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप अशोक जगदाळे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुर्णपणे निवडणुकीमध्ये आपली ताकद लावली. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या लोकांनी विश्वासघात केल्याने आपला पराभव झाल्याची खंत त्यांनी उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर व्यक्त केली. 

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा विजय झाला आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं, तर अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. त्याचबरोबर, 25 मतं बाद ठरली आहेत.

Web Title: Ashok Jagdale statement after result