आश्रमशाळेतील विद्यार्थी देणार इस्रोला भेट

यमगरवाडी (ता. तुळजापूर) : इस्रोला भेट देण्यासाठी निवड झालेले सागर खडसे व अनिरुद्ध म्हेत्रे.
यमगरवाडी (ता. तुळजापूर) : इस्रोला भेट देण्यासाठी निवड झालेले सागर खडसे व अनिरुद्ध म्हेत्रे.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्‍यातील यमगरवाडी येथील एकलव्य आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

विज्ञान संमेलनात सहभाग 
तालुक्‍यातील एकलव्य विद्यालयातील सागर खडसे व अनिरुद्ध म्हेत्रे या दोन विद्यार्थ्यांना इस्रोला 20 ते 24 जानेवारी या कालावधीत भेट देण्याची संधी मिळाली आहे. सागर, अनिरुद्धने जानेवारी 2019 मध्ये डोंबिवली येथे पार पडलेल्या विज्ञान संमेलनात सहभाग नोंदविला होता. या संमेलनातील पहिल्या दहा प्रयोगांतील विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देण्याची संधी मिळणार होती. 

140 प्रयोगांतून सहावे स्थान 
विज्ञान संमेलनात या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नायट्रोजन बेस्ड सॅन कॅचर या प्रयोगाला सहावे स्थान 140 प्रयोगांतून मिळाले. त्यामुळे सागर, अनिरुद्धला इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी दयानंद भडंगे, यशवंत निंबाळकर, बालाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल दोघांचे भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, सचिव विवेक आयाचित, गिरीश कुलकर्णी, नरेश पोटे, अशोक संकलेचा, नरसिंग झरे, सतीश कोळगे, विजय वाघमारे, मदन कुलकर्णी, गणेश जळके, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णा कोल्हटकर, अण्णा मगर, महादेव शेंडगे, अशोक बनकर, दयानंद भडांगे, संतोष बनसोडे, हरीश मगदूम, संगीता पचंगे, निर्मला हुग्गे, दत्ता भोजने, भीम कुंभार, अनिल घुगे, कोंडिबा देवकर, खंडू काळे, रमाकांत पवार, शालिवाहन वाघमोडे, अशोक राठोड यांनी अभिनंदन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com