आष्टीत अवकाळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

तावरणातील आर्द्रतेमुळे घामाच्या धारा सहन करणारे आष्टीकर पावसाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वाजता ढग दाटुन आले अन्‌ वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला

आष्टी - आठवडाभर कडक उन्हासह ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने घामाघूम झालेल्या आष्टीकरांना शुक्रवारी (ता. 12) दुपारी अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसाने तात्पुरता दिलासा मिळाला.

आष्टी शहरासह तालुक्‍यात गेला आठवडाभर सकाळी उन्हाच्या चटक्‍यानंतर सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे घामाच्या धारा सहन करणारे आष्टीकर पावसाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वाजता ढग दाटुन आले अन्‌ वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. सुमारे अर्धा तास दमदार हजेरी लावल्यानंतर थोडा वेळ रिमझीम पाऊस सुरूच होती. शहरातील भाजीमंडई चौक, आनंदऋषीजी चौक, शनी चौक, शिवाजी चौक आदी भागांत पाणी साचले होते.

Web Title: ashti witness unseasonal rain