'एएसआय' कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - 'एमजीएम'चे उपअधिष्ठाता तथा सर्जरी विभागप्रमुख डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या (एएसआय) कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली. "एएसआय' ही सर्जन्सची देशातील सर्वोच्च संघटना आहे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन झालेल्या निवडणुकीत डॉ. सूर्यवंशी यांची देशभरातील 76 उमेदवारांमधून सर्वाधिक मते मिळविल्याने निवड झाली आहे.

डॉ. सूर्यवंशी 2019 ते 2021 या तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली. "एएसआय'च्या कार्यकारिणी समितीमध्ये निवडून जाणारे डॉ. सूर्यवंशी हे मराठवाड्यातील पहिले सर्जन आहेत. त्यांच्या निवडीचे एमजीएम संस्थेचे विश्‍वस्त अंकुशराव कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, वैद्यकीय संचालक डॉ. ए. जी. श्रॉफ व एमजीएम मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर. बी. बोहरा यांनी अभिनंदन केले.

Web Title: ASI Workign Committee member Dr. Pravin Suryavanshi Selection