मंत्र्यांना निवेदने कसली देता, त्यांना कामांचा जाब विचारा - राज ठाकरे

वैजापूर येथे प्रचारसभेत बाेलताना राज ठाकरे
वैजापूर येथे प्रचारसभेत बाेलताना राज ठाकरे

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः मंत्र्यांना निवेदने कसली देता? त्यांना न केलेल्या कामांचा जाब विचारा. तुमच्याविषयी त्यांच्या मनात भिती निर्माण झाली तरच विकास होईल. त्यांच्याबद्दल तुम्हाला रागसुद्धा आला पाहिजे. मतदारांच्या मनातला हा सुप्त राग व्यक्त करण्यासाठीच मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षात बसवायचे आहे. त्यासाठीच ही निवडणुक लढणार आहे ' असे  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी बुधवारी (ता.16) वैजापूर येथे केले.

वैजापूर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संतोष जाधव यांचा प्रचार करण्यासाठी ते वैजापूर येथे आले होते. डेपो रस्त्यावर त्यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी वैजापूरसह गंगापूर, औरंगाबाद व फुलंब्री येथील मनसेचे उमेदवार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com