अस्मितादर्श संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

लातूर - लातूर शहरात येत्या 14 व 15 जानेवारीला होणाऱ्या 34व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांची, तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची निवड झाल्याची घोषणा आज करण्यात आली. राज्य शासनाचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गादेकर म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य व तत्त्वज्ञानातून मानवतावादी प्रागतिक मूल्यविचार उजागर करण्याच्या भूमिकेतून हे साहित्य संमेलन होत आहे. शहरातील दयानंद सभागृहात दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवर साहित्यिक चर्चा होणार आहे. वैचारिक अभिसरणाच्या दृष्टीने नवा सामाजिक संदेश देण्यासाठी समग्र बहुजन समाजाला सामावून घेतल्याने या संमेलनाचे वेगळे वैशिष्ट्य असणार आहे.

लातूर येथे होत असलेल्या 34 व्या संमेलनाच्या मार्गदर्शक मंडळात डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. नागोराव कुंभार, डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांचा समावेश आहे. संमेलनात चार परिसंवाद, दोन कविसंमेलने, कथाकथन, संविधान रॅली, शोधनिबंध वाचन व चर्चा, पथनाट्य, लेखक- वाचक मुक्त संवाद, ग्रंथ प्रदर्शन व चित्र प्रदर्शन असे वैचारिक आणि साहित्यिक कार्यक्रम होणार असल्याचे डॉ. गादेकर यांनी सांगितले.

Web Title: Asmitadarsh sammelan Pradnya Pawar