जिंतूरमध्ये आर्थिक व्यवहारातून एकावर प्राणघातक हल्ला, जखमी येलदरीचा रहिवाशी

राजाभाऊ नगरकर
Tuesday, 26 January 2021

येलदरी रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सोमवारी (ता. २५) रात्री दहाच्या सुमारास घडली.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये झालेल्या भांडणात एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना येलदरी रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सोमवारी (ता. २५) रात्री दहाच्या सुमारास घडली. एकाची प्रक्रती चिंताजनक असल्याने त्याला परभणी येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री येलदरी रोड परिसरातील रहिवाशी अब्दुल बासित अब्दुल मन्नान (वय ३८ वर्षे) याचे व रिसोड (जिल्हा वाशिम) येथील नसीबअली साहेबआली (वय ३८ ) या दोघांमध्ये स्टँडर्ड ट्रान्सपोर्ट या दुकानात आर्थिक वादातून भांडण झाले. भांडणाचे पर्यावसान तीक्ष्ण हत्याराने हाणामारीत झाले. यामध्ये अब्दुल बसित याच्या गळ्याला गंभीर मार लागल्याने त्याला नागरिकांनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रक्रती चिंताजनक असल्याने प्रथमोपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री दहा वाजता हलवण्यात आले. तर नसीब आली यांच्या हाताला देखील मार लागल्याने त्याचेवर जिंतूर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

हेही वाचाशिवेंद्रसिंहराजेच नाही, तर अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचा पक्का दावा

या घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. स्वामी हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटास्थळाची पाहणी करुन रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नस्लायचे पोलिसांनी सांगितले.
 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assault on one of the financial transactions in Jintur, injured Yeldari resident parbhani news