अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश उद्या परभणीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

परभणी : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थीकलश अंतिम दर्शनासाठी गुरुवारी (ता. 23) परभणी येथे आणला जाणार आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली. 

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश परभणीकरांना दर्शनासाठी आणला जात आहे. गुरुवारी (ता. 23) सायंकाळी 6:00 वाजता शहरातील विसावा कॉर्नर येथे या कलशाचे आगमन होणार आहे.

सदर अस्थिकलश रथ यात्रेचा मार्ग परभणी शहरातून  विसावा कॉर्नर, महाराणा प्रताप चौक (रायगड कॉर्नर), नानलपेठ, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर, स्टेशन रोड, शिवाजी महाराज पुतळा, बी. रघुनाथ सभागृह असा राहणार आहे. अस्थीकलश बी.रघुनाथ सभागृहात मुक्कामी राहणार आहे. परभणीकरांना अटलजींच्या अस्थीकलशाचे अंतिम दर्शन बी.रघुनाथ सभागृहात घेता येईल.

शुक्रवारी (ता. 24) सकाळी 8:00 वा. बी.रघुनाथ सभागृह ते खानापूर फाट्यापर्यंत अस्थीकलशाची भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत अच्युत महाराज दस्तापुरकर, बालासाहेब महाराज पौळ व भजनीमंडळी सहभागी होणार आहेत. नंतर नांदेड येथे गोदावरी नदीत विसर्जन करण्यासाठी अस्थीकलश रथ मार्गस्थ होणार आहे. सर्व परभणीकरांनी पदयात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान  परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे व परभणी महानगर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: asthikalash of atal bihari vajpayee in parbhani tomorrow