एटीएम मशीन पळवून नेल्यानंतर औरंगाबादेत पुन्हा काय घडले? 

मनोज साखरे 
रविवार, 14 जुलै 2019

सुरक्षा यंत्रणा बेफिकीर 
बायपास भागातील चक्क एटीएम मशीन पळवण्याचा प्रकार घडला, चोरांनी लाखो रुपये नेल्याचा अंदाज आहे. पुन्हा छावणीत असाच प्रकार घडता-घडता राहिला. परंतु एटीएम केंद्राची सुरक्षा यंत्रणा बेखबर आणि बेफिकीर दिसत आहेत. एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याने असे प्रकार घडत आहेत.

औरंगाबाद :  बीड बायपास भागातील एसबीआयचे  एटीएम मशीन चक्क उखडून चोरांनी वाहनातुन पळवून नेले. अजब चोरी केल्यानंतर पुन्हा चोरांनी छावणीच्या पडेगाव भागात एका एटीएम मशीनला खिंडार पाडले पण पोलिस येण्याची चाहूल लागताच त्यांनी धूम ठोकली. 

शुक्रवारी (ता. 12) रात्रीतुन चोरांनी बीड बायपास भागातील दत्तमंदिर समोरील एटीएम केंद्रात घुसून मशीनच उखडून पळवले. या प्रकाराने पोलिस आणि शहरवासीय अचंबित झाले. या प्रकारानंतर एटीएम केंद्र  सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली असली तरी चोरांनी पुन्हा धिटाई करीत छावणीतील मिसबाह काॅलनीत रविवारी (ता. 14) पहाटे तीन ते चार दरम्यान  एटीएम केंद्रात प्रवेश केला. एटीएम मशीन तोडण्याचा चोरांनी प्रयत्न केला. बराच वेळ खटपट सुरु असताना पोलिस येत असल्याची चाहूल लागली आणि त्यांना पळता भुई थोडी झाली. त्यांनी सोबत आणलेल्या चारचाकी वाहनातून पळ काढला. पोलिस येण्याच्या आत चोरांची टोळी पसार झाली. या प्रकारानंतर छावणी पोलिस एटीएम केंद्रात गेले त्यांनी पाहणी केली. या प्रकाराचे  सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे प्रयन्त पोलिस करीत आहेत. 

सुरक्षा यंत्रणा बेफिकीर 
बायपास भागातील चक्क एटीएम मशीन पळवण्याचा प्रकार घडला, चोरांनी लाखो रुपये नेल्याचा अंदाज आहे. पुन्हा छावणीत असाच प्रकार घडता-घडता राहिला. परंतु एटीएम केंद्राची सुरक्षा यंत्रणा बेखबर आणि बेफिकीर दिसत आहेत. एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याने असे प्रकार घडत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atm machine thief in Aurangabad